Kishori Pednekar : “ती घाणेरडी नटी तिच्यावर…” ; कंगना रणौतवर किशोरी पेडणेकर संतापल्या
Kishori Pednekar : कंगणाने केलेल्या वक्तव्याचा मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Kishori Pednekar : कॅाक्रोच जतना पार्टीच्या आंदोलनामुळे संसदेचा पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पूर्ण पाण्यात गेला. विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले असून त्याचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात पाहायला मिळाले. आता दुसऱ्या आठवड्यात या आंदोलनात विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज प्रकरणी आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेत सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. तसेच विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
यामुळे राजकारण तापले असतानाच खासदार कंगणा राणौतने z झेड विषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले असून कंगणाने केलेल्या वक्तव्याचा मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
जनंत मंतरवर आंदोलन करणाऱ्या आंदोलक तरुणांना थेट ‘गटारछाप पिढी’ या शब्दांचा वापर कंगणा रणौतने केला होता. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकाच ठिकाणी इतका कुरूप, उथळ आणि असभ्य प्रकार कधीच पाहिला नाही, असेही तिने म्हटलं होतं. तिच्या याच वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार पलटवार केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी किशोरी पेडणेकर यांना कंगणा राणौतने z झेड विषयी केलेल्या वक्तव्याविषयी काय वाटतं असा सवाल केला. त्यावर त्या म्हणाल्या “ती घाणेरडी नटी आहे. तिच्यावर थू केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे. अशी घाणेरडी कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं…अशी उद्विन प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली.
नेमकं काय म्हणाली होती कंगणा राणौत?
“भारत हा सुसंस्कृत लोकांचा देश आहे. तुम्ही स्वतःला ‘कॉकरोच’ म्हणता आणि त्यांच्यासारखेच वागता. तुम्ही जगासमोर फक्त घाण आणि विद्रूपता मांडत आहात. यांना जन्म कोण देतंय? या आंदोलनाचे व्हिडीओ पाहून मानसिक धक्का बसल्यामुळे आता स्वतःला सावरण्यासाठी आपल्याला ‘डिजिटल डिटॉक्स’ची (सोशल मीडियापासून दूर राहण्याची) गरज आहे. तसेच समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं. तरीही, ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या स्वातंत्र्याचं ते अभिमानानं प्रदर्शन करतात.” असं कंगणाने म्हटलं होतं.





