Thane News : ठाणे जिल्ह्यात (Thane News) सध्या बांधकाम सुरू असलेल्या दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्पाच्या ठिकाणी शनिवारी एक क्रेन कोसळली. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भाईंदर (पश्चिम) येथे दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रघुनाथ दास (३८) आणि काना सिंग (४५) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दहिसर ते भाईंदर लिंक रोडचे (Thane News) काम करण्यासाठी एल एन्ड टी संस्थेने उभारलेल्या प्रकल्प स्थळी काम करत होते. दरम्यान शनिवारी साडेबाराच्या सुमारा संस्थेने उभारलेल्या क्रेनवर काम करत असताना ती अचानक कोसळली. Thane News त्यामुळे यात दोन कामगार गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी (Thane News) आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे, असे भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सांगितले. क्रेन कोसळण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि यात कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत होता का, हे निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले. दरम्यान, या दुर्घटनामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.