शिवसेनेची भाईगिरी! बंदला प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षाचालकांना मारहाण

Updated On:

ठाणे – राज्यात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदमध्ये रिक्षा चालवत असल्याच्या कारणावरुन स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून राज्यात आज महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या बंदला राज्यातील अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. असाच एक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे. येथील स्टेशन परिसरात रिक्षा चालकांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होतो आहे.

ठाण्यातील बंदला प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयत्न केला. ठाण्याचे शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी देखील या मारहाणीत सहभागी असल्याचे पाहायला मिळाले.

केवळ रिक्षाच सुरु असल्याने बंद पूर्णपणे यशस्वी कारण्यासाठी शिवसैनिकही यावेळी आक्रमक झाले. जांभळी नाका परिसरात रिक्षाचालकांना मारहाण करण्याचा हा प्रकार घडला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sulekha Chavan : एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का! 'या' महिला नगरसेविकेचे पद रद्द

2026-09-10 07:46:22

Sulekha Chavan : एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का! 'या' महिला नगरसेविकेचे पद रद्द

Navnath Ban: "निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, MPSC सगळे चुकीचे फक्त संजय राऊतच बरोबर?" ; भाजपची खोचक टीका

2026-09-08 12:39:59

Navnath Ban: "निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, MPSC सगळे चुकीचे फक्त संजय राऊतच बरोबर?" ; भाजपची खोचक टीका

Sanjay Raut : डीजेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री तटस्थ भूमिकेत; संजय राऊत यांची टीका

2026-09-07 18:09:39

Sanjay Raut : डीजेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री तटस्थ भूमिकेत; संजय राऊत यांची टीका

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर’ पुन्हा होणार? ठाकरे गटाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा

2026-09-07 09:14:42

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर’ पुन्हा होणार? ठाकरे गटाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम

2026-09-06 22:35:31

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम