Thalapathy Vijay : विजयच्या ‘जन नायकन’ला पायरसीचा फटका; 6 जणांना अटक
टीव्हीके पक्षाचे सर्वेसर्वा व दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयच्या (Thalapathy Vijay) बहुप्रतिक्षित जन नायकन या चित्रपटाची एचडी आवृत्ती ऑनलाइन लीक केल्याप्रकरणी तामिळनाडू सायबर गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे.

Thalapathy Vijay : टीव्हीके पक्षाचे सर्वेसर्वा व दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयच्या (Thalapathy Vijay) बहुप्रतिक्षित जन नायकन या चित्रपटाची एचडी आवृत्ती ऑनलाइन लीक केल्याप्रकरणी तामिळनाडू सायबर गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे.
चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच १० एप्रिल रोजी हा चित्रपट (Thalapathy Vijay) विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला होता, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ माजली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी क्लाउड स्टोरेज आणि शेअरिंग ड्राइव्ह लिंक्सचा वापर करून पायरसी पसरवली होती.
याप्रकरणी सायबर शाखेने ३०० हून अधिक बेकायदेशीर लिंक्स ब्लॉक (Thalapathy Vijay) केल्या असून सोशल मीडिया आणि फाइल-शेअरिंग साइट्सवर कडक देखरेख ठेवली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता आणि कॉपीराइट कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एच. विनोद दिग्दर्शित हा चित्रपट विजयचा राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचा शेवटचा चित्रपट असल्याने चर्चेत आहे. पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, पायरसी केलेले साहित्य शेअर करणे हा दखलपात्र गुन्हा असून, अशा कृत्यात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.





