Thailand : राजधानी बॅंकॉकमध्ये वायूप्रदूषण धोकादायक पातळीवर; प्रशासनानं लोकांना….

बॅंकॉक – थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये वायू प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत वाढल्यानं लोकांना घरातून काम करण्याचा आणि मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनानं लोकांना प्रवासासाठी खासगी गाड्यांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन केले आहे.
थायलंडमध्ये वायू प्रदूषणामुळं आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या या आठवड्यात दुप्पट झाली असून, ती जवळपास दोन लाख 13 हजारांवर गेली आहे. गेल्या आठवड्यात ही संख्या सुमारे 96 हजार होती.
बहुतेकांना श्वसनमार्गाच्या समस्या तसंच त्वचारोग किंवा डोळ्यांची जळजळ यांसारखी लक्षणे जाणवत आहेत. थायलंडमध्ये डिसेंबर ते एप्रिल दरम्यान, विशेषत: वायव्य भागात शेतात आग लावली जाते तसंच जंगलातील वणव्यांमुळेही वायू प्रदूषण वाढल्याचे दिसून येते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/donald-trump-kicks-off-2024-us-elections-bid-with-events-in-early-voting-states/
बॅंकॉकमध्ये वाढते कारखाने, बांधकाम आणि वाहतुकीमुळं वाढलेल्या वायू प्रदुषणात आगीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भर पडल्यानं स्थिती गंभीर झाली आहे.





