Sushma Andhare : मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर पदासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याशिवाय महापौर निवडीवेळी ठाकरे सेनेचे नवनिर्वाचित ६५ नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. या सगळ्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेणारी पोस्ट शेअर केली आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे आणि फडणवीस या दोघांची महापौर पदावरून चाललेली रस्सीखेच माध्यमांमध्ये रंगत आहे. यात दोघांनीही ठाकरेंना मध्ये ओढण्याचे कारण नाही, अशा शब्दांत अंधारेंना सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. पुढे त्या म्हणाल्या, शिंदे फडणवीस या दोघांनी एकमेकांशी काय सौदेबाजी करायची ती खुशाल करावी. स्वतःचा मोलभाव वाढवण्यासाठी ठाकरेंना ऑफर किंवा ठाकरेंकडून प्रस्ताव अशा पद्धतीचे लुटूपुटुचे डाव खेळू नयेत. तुम्हाला टीका करायलाही ठाकरे आणि सत्तेत बसण्यासाठी एकमेकांवर दबाव तंत्र वापरण्यासाठीही ठाकरे कार्ड का वापरावे लागत आहे? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे. शिंदे आणि फडणवीस या दोघांची महापौर पदावरून चाललेली रस्सीखेच माध्यमांमध्ये रंगत आहे. यात दोघांनीही ठाकरेंना मध्ये ओढण्याचे कारण नाही. शिंदे फडणवीस या दोघांनी एकमेकांशी काय सौदेबाजी करायची ती खुशाल करावी. स्वतःचा मोलभाव वाढवण्यासाठी ठाकरेंना ऑफर किंवा ठाकरेंकडून प्रस्ताव… pic.twitter.com/WQ7Rt64gOD — SushmaTai Andhare (@andharesushama) January 19, 2026 ठाकरेंचे नगरसेवक कुठेही नॉटरीचेबल नाहीत. त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये डांबून ठेवलेलं नाही. ठेवायची गरज नाही. त्यामुळे टेबल न्यूज पेरण्याचा बालिश प्रयत्न कोणीही करू नये. लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला मते दिलेली आहेत तो विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षा लाखमोलाचा आहे..! आम्ही लढतोय लढत राहू.. ! याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय..!! असे देखील सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. संजय राऊतांचा खोचक टोला महापौर पदावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे महापौर पद अडीच वर्ष मिळावे, या मागणीसाठी आग्रही आहेत. अशातच त्यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित २९ नगरसेवकांना ताज हॅाटेलमध्ये ठेवले आहे. या सगळ्या घडामोडीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत “आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाहीत. कुणाला महापौर करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील,” असा खोचक टोला लगावला आहे. हेही वाचा : “डेन्मार्क, आता वेळ आलीय…” ; ग्रीनलँडबद्दल ट्रम्पचा इशारा ; काय करणार? वाचा सविस्तर