ठाकरे बंधूंचे सहकुटुंब मतदान ; उद्धव ठाकरे म्हणाले, जनता पैशांचा पाऊस स्वीकारणार नाही” तर राज ठाकरे काय म्हणाले ?वाचा

Thackeray family voting । देशात लोकसभा निवडणुकांचा आज पाचवा टप्पा पार पडतोय. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये आज मतदान होतंय. या जागांसाठी आज ठाकरे बंधू मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले होते. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनता पैशांचा पाऊस स्वीकारणारे नाही असे म्हटले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जनता मोठ्या प्रमाणात मतदान करेल असा विश्वास व्यक्त केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील बालमोहन शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर, उद्धव ठाकरे यांनी वांद्रे याठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला.
राज ठाकरेंनी केले मतदान Thackeray family voting ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शीवतीर्थवरुन मतदानकेंद्रापर्यंत चालत जाऊन मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सुष्ना मिताली ठाकरे उपस्थित होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “उन्हाळ्याचे दिवस आहेत. आताच सुरुवात झाली आहे. संध्याकाळी सहापर्यंत मतदान सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त मतदान बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावतील अशी मला अपेक्षा आहे. ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला आहे. ते सर्वजण मतदानासाठी घराबाहेर पडतील. पण ज्यांनी आशाच सोडल्यात त्यांचं काही सांगता येत नाही.
#WATCH | Rashmi Thackeray, wife of former Maharashtra CM Uddhav Thackeray, shows the indelible ink mark on her finger after casting her vote at a polling booth in Mumbai.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/oe50FfRsJa
— ANI (@ANI) May 20, 2024
पैशांच्या प्रलोभनांना जनता भुलणार नाही Thackeray family voting ।
ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी वांद्रे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडून पडून मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी मतदान करतील. आज एका निगेटिव्ह विषय हा जुमलेबाजांच्या बाजूने जातोय, कारण पैशाचा पाऊस स्वीकारणार नाहीत, कारण पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला नाहीत.” तसेच, पैशांच्या प्रलोभनांना जनता भुलणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
देशासाठी आणि संविधान संवर्धनासाठी मत महत्त्वाचं
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “आम्ही देशासाठी मतदान केलंय, संविधान रक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही मतदान करा, हा तुमचा हक्क आणि अधिकार आहे. काही ठिकाणी मतदार यादीत गोंधळ दिसतोय, उन्ह आहे, सावलीसाठी मंडप वगैरेची सोय करायला हवी… निवडणूक आयोगाने तयारी करायला हवी होती. अनेक ठिकाणी मतदानाच्या रांगा आहेत, मतदार बाहेर येतील आणि मतदान करतील.”





