बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुना भोपळा; ‘जागा दाखवली’ म्हणत प्रसाद लाड यांनी डिवचलं

Uddhav Thackeray And Raj Thackeray | ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणूकीत मोठा फटका बसला आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीने बेस्ट पतपेढी निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलला 21 पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील तब्बल ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. यावरून आता भाजपने ठाकरे बंधूना डिवचण्यास सुरुवात केली आहे.
‘जागा दाखवली’ प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधुंना टोमणा
भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘जागा दाखवली’ असं म्हणत ठाकरे बंधुंना टोमणा मारला आहे. “बेस्ट इलेक्शनमध्ये ‘ठाकरे’ ब्रँड 21 समोर 000,””00/21 म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत,” असंही लाड यांनी शेअर केलेल्या फोटोत म्हटलं आहे. फेसबुकवर ‘उबाठा आता तरी हवेतून खाली या,’ असा खोचक सल्ला प्रसाद लाड यांनी दिला आहे.
जागा दाखवली…. pic.twitter.com/waPJMkMuL9
— Prasad Lad (@PrasadLadInd) August 19, 2025
दुसरीकडे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर लिहिले की, “एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेलं नाही, आणि दुसऱ्याकडे कमवण्यासाठी काही राहिलेलं नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्यं जोडली, तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येतं, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहिती असलेले उत्तर ओळखलं नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’ निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचं आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे”, असे उपाध्ये म्हणाले. Uddhav Thackeray And Raj Thackeray |
शशांक राव यांच्या पॅनेलने मिळवली सत्ता
बेस्टच्या 35 आगारांत बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये 83 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. समोर आलेल्या निकालानुसार बेस्ट पतपेढी निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने सत्ता मिळवली आहे. 21 पैकी 14 जागांवर शशांक राव यांच्या पॅनेलने विजय प्राप्त केला. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत. तर बेस्ट पतपेढीतील 9 वर्षाची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे. Uddhav Thackeray And Raj Thackeray |
हेही वाचा:





