टेस्लाचे बाजारमूल्य कोसळले
Updated On:

न्यूयॉर्क – ऍलन मस्क यांच्या नियंत्रणाखालील इलेक्ट्रिक कार बनविणाऱ्या टेस्ला कंपनीचे बाजारमूल्य आज एकाच दिवसात 50 अब्ज डॉलरनी कमी झाले.
या कंपनीचा शेअर जवळजवळ 11 टक्क्यांनी कोसळला. या कंपनीने बराच गाजावाजा करून काल बॅटरी डे आयोजित केला होता. या दिवशी अतिशय स्वस्त, टिकाऊ आणि दीर्घकाळ चालणारी बॅटरी ही कंपनी बाजारात उपलब्ध करण्याची शक्यता वाढली होती.
मात्र, कंपनीच्या सर्वसाधारण सभेत मस्क यांनी केलेल्या भाषणामुळे गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला.ते म्हणाले की, स्वस्त बॅटरीसाठी 3 वर्ष लागतील.





