जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, तीन दिवसांत लष्कर आणि दहशतवादी 4 वेळा आमनेसामने
Updated On:

terrorist attack – जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यानंतर दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली. केंद्रशासित प्रदेशात गेल्या तीन दिवसांतील ही चौथी चकमक आहे.
जम्मू विभागातील डोडा भागात कालपासून झालेली ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला होता. 9 जून रोजी रियासी येथे दहशतवाद्यांनी यात्रेकरूंवर हल्ला केला होता ज्यात नऊ जण ठार झाले होते. याशिवाय कठुआ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.





