दहशतवादी अबू सैफुल्लाहचा पाकिस्तानात खात्मा; नागपुरमधील संघ मुख्यालयावर हल्ल्याचा रचला होता कट

Terrorist Abu Saifullah | लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत त्याला ठार केल्याची माहिती समोर आली आहे. अबू सैफुल्लाह हा भारतातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार होता.
भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारख्या मोठ्या दहशतवाद्यासह १०० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.
अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या
अबू सैफुल्लाह हा पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधून काल दुपारी त्याच्या निवासस्थानातून बाहेर पडला. त्यावेळी एका क्रॉसिंगजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. मात्र त्याच्यावर नेमकी गोळ्या कोणी झाडल्या? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, २००१ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ छावणीवर हल्ला, २००५ मध्ये बंगळुरू येथील इंडियन सायन्स काँग्रेसवरील हल्ल्याचा अबू सैफुल्लाह सूत्रधार होता. अबू सैफुल्लाहने नागपुरातील संघ मुख्यालयावर हल्ल्याचा कटही आखला होता. Terrorist Abu Saifullah |
अबू सैफुल्लाह तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार
- अबू सैफुल्लाह हा लष्कर-ए-तोयबाचं काम करायचा. गेल्या काही दिवसांपासून तो नेपाळमध्ये सक्रीय होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. अबू सैफुल्लाह हा अनेक अतिरेकी संघटनाच्या कृत्यांमध्ये आर्थिक सहाय्य करत असल्याचे सांगितले जाते.
- नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयावर 2006 मध्ये त्याने दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. दहशतवादी एका अॅम्बेसेडर कारमधून पोलिसांच्या गणवेशात आले होते. मात्र हल्ल्याआधीच पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
- आरएसएस मुख्यालयावरील हल्ल्याव्यतिरिक्त, तो लष्कर दहशतवादी खालिद 2005 मध्ये बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही सहभागी होता, ज्यामध्ये आयआयटीचे प्राध्यापक मुनीश चंद्र पुरी यांचा मृत्यू झाला होता आणि इतर चार जण जखमी झाले होते.
- 2008 मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर झालेल्या हल्ल्याचाही अबू सैफुल्लाह हा सूत्रधार होता, ज्यामध्ये सात जवान आणि एक नागरिक ठार झाला होता. Terrorist Abu Saifullah |
हेही वाचा :
मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”





