पत्नी अन् २ मुलांसमोरच IB अधिकाऱ्याला घातल्या गोळ्या ; लष्करी गणवेश परिधान करून केला दहशतवाद्यांनी हल्ला

Terror Attack in pehalgam । जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यात अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी मनीष रंजन यांनाही गोळ्या घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मनीष रंजन हे हैदराबादमधील आयबी कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्हणून काम करत होते. मनीष रंजन हे मूळचे बिहारचे रहिवासी होते आणि ते त्याच्या कुटुंबासह जम्मू-काश्मीरमधील पहलगामला भेट देण्यासाठी गेले होते. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगीही होती.
पत्नी आणि दोन मुलांसमोर गोळ्या घालून ठार Terror Attack in pehalgam ।
दहशतवाद्यांनी आयबी अधिकारी मनीष रंजन यांना त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसमोर गोळ्या घालून ठार मारले. अचानक झालेल्या हल्ल्यातून मनीष रंजन सावरू शकले नाहीत. दहशतवादी लष्कराचा गणवेश घालून आले होते,त्यामुळे, पहागमच्या बैसरण खोऱ्यात सुट्टी घालवणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा संशय आला नाही. लोकांनी लष्करी गणवेश घातलेल्या दहशतवाद्यांना लष्करी जवान समजले. म्हणूनच दहशतवादी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना लक्ष्य करू शकले. या हल्ल्यात मनीष रंजनची पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले सुरक्षित आहेत.
या हल्ल्यात आतापर्यंत २७ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे तर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जम्मू-काश्मीरमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक, मंगळवारी दुपारी अडीच वाजता पहलगाममधील बैसरन मैदानावर गणवेशधारी दहशतवाद्यांच्या एका गटाने पर्यटकांवर गोळीबार केला.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्धवट थांबवला आणि बुधवारी सकाळी दिल्लीला परतले. दिल्ली विमानतळावरच, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांनी पंतप्रधान मोदींना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली. हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सौदी क्राउन प्रिन्सशी द्विपक्षीय चर्चा केली परंतु अधिकृत डिनरला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांचा दौरा अर्धवट थांबवून रात्री भारताला रवाना झाले.
तरुण नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू Terror Attack in pehalgam ।
पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यात तरुण नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांनाही आपला जीव गमवावा लागला. १९ एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले आणि ते त्यांच्या मधुचंद्रासाठी काश्मीरला गेले. त्यांची पोस्टिंग कोची येथे होती. लेफ्टनंट विनय नरवाल हा मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. या हल्ल्यात त्याची पत्नी सुरक्षित आहे. हे जोडपे सोमवारी श्रीनगरला पोहोचले आणि नंतर पहलगामला भेट देण्यासाठी गेले. या घटनेनंतर, विनय नरवालच्या पत्नीचा तिच्या पतीच्या मृतदेहासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विनय नरवाल हा हरियाणातील कर्नालचा रहिवासी होता. तो कर्नालमधील सेक्टर ७ चा रहिवासी होता. तो २ वर्षांपूर्वी नौदलात सामील झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरला रवाना झाले आहेत.





