छत्रपती संभाजीनगर – गायक अरिजीत सिंग याच्या गाण्यांनी तरुण वर्गाला वेड लावले आहे. त्याच्या गाण्यासह साध्या स्वभावाने त्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. यामुळेच अरिजित मोठा चाहता वर्ग आहे. मात्र नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अरिजीत सिंगसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला चाहतीने अरिजीत चा हात खेचल्याने त्याला दुखापत झाली आहे.
A female audience pulls Arijit’s hand during a live concert in #Aurangabad.#ArijitSingh #music #Bollywood #ArijitSinghLive pic.twitter.com/NPSiwyPnbk
— Arijit Singh Fan (@SinghfanArijit) May 8, 2023
मात्र हाताला दुखापत होऊन देखील अरिजीतने या महिलेला शांतपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये “तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल. माझे ऐका, बोलू नका. तुम्ही मजा करत होता, ते ठीक आहे, पण जर मी परफॉर्म करू शकत नाही, तर तुम्ही मजा कशी करणार आहात? तुम्ही एक समजूतदार व्यक्ती आहात ना? तुम्ही माझा हात का ओढला माझा हात आता थरथरत आहे. मी कार्यक्रम सोडू का? येथून जाऊ का?” असे अरिजीत या महिलेला म्हणताना दिसत आहे.
Dada got injured in #Aurangabad concert. Please behave good to a artist like him, performing 4 hrs straight without break for audience. Be kind & enjoy the #Music…#ArijitSingh #ArijitSinghLive #Bollywood pic.twitter.com/34OIyszY9R
— Arijit Singh Fan (@SinghfanArijit) May 8, 2023
यावर ती महिला चुकून झालेल्या कृतीबद्दल अरिजीतची माफी मागताना दिसते. अरिजितने ही परिस्थिती शांततेत हाताळत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. तर व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये अरिजीतला हातावर पट्टी बांधताना दिसत आहे. यावेळी अरजित त्या माणसाला पट्टी घट्ट बांधून तो रोल करण्यास सांगत असल्याचे दिसून येते.
तर एका चाहत्याने अरिजीत सिंगच्या हाताचा फोटो शेअर करत, ‘एक कलाकार तुमच्यासाठी तासनतास न थांबता परफॉर्म करतो. एखादा शो पार पाडण्यामागे अनेक जणांची मेहनत असते. पण चाहत्यांकडून अशी वागणूक अपेक्षित नाही. कृपया कलाकारांचा आदर करा. गाण्याचा आनंदचा घ्या आणि कलाकरांसोबत नम्रतेने वागा,’ असा सल्ला दिला आहे.