समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक; 15 प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरने पाठिमागून जोरदाची धडक दिली, हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे.
दरम्यान या टेम्पो ट्रॅव्हलरमधून एकूण 15 प्रवासी प्रवास करत होते, या अपघातामध्ये हे 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जखमींपैक चालक आणि वाहकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्सने ट्रकला दिलेली धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. जखमींपैकी ड्रायव्हर आणि सहायकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.





