कोट्रोशी पुलावर टेम्पो दरीत कोसळून भीषण अपघात; ३८ कामगार जखमी, तळदेव आरोग्य केंद्रात उपचार सुरू
Updated On:

पाचगणी – महाबळेश्वरहून तापोळ्याला जाणारा कामगारांचा टेम्पो कोट्रोशी पुलाजवळ खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून या टेम्पोमध्ये ३८ कामगार आहेत. तसेच लहान मुलेही आहेत. जखमींना तातडीने तळदेव ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काहींना तेथून महाबळेश्वर येथे पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे.
या अपघातात दोन गर्भवती महिला, काही लहान मुलेही होती. हा टेम्पो ५० ते ६० फूट दरीत कोसळला आहे. हा भीषण अपघात पहाटे घडल्याची माहिती आहे. मदत आणि बचाव काम सुरू आहे.




