उत्तरप्रदेशात भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशात झालेल्या अपघातात बिहारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांची कार प्रयागराजकडे जात असताना बादशहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका रस्त्यावर त्यांच्या कारला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला.
कुटुंबातील इतर तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर वाराणसीमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गजधर शर्मा (६०), त्यांचा मुलगा अनिश शर्मा (३५), जवाहर शर्मा (५७) आणि त्यांचा १७ वर्षीय मुलगा, सोनम(३४) आणि रिंकू (३२) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या अपघातानंतर ट्रक चालक पळून गेल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.





