शिक्रापूर – कोंढापुरी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून आज सकाळच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या मद्यधुंद बसचालकाने येथील चौकातील तब्बल सहा दुचाकी वाहनांसह एका सायकलला चिरडले असून
या अपघातात एक मंदिर पूर्णपणे तुटले असून चार दुकानांचे मोठे नुकसान होत एक माजी सरपंच व अन्य एका इसमाचा मृत्यू होऊन तिघेजन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
कोंढापुरी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून जेबील कंपनीच्या कामगारांना सोडून एम एच १२ के क्यू ३३१९ या बसवरील चालक बस घेऊन चाललेला असताना अचानकपणे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडकून बस पुढे एका मंदिराला धडकली,
दरम्यान बसने यावेळी शेजारील काही दुचाक्या व एका सायकलला चिरडून बस समोरील भल्या मोठ्या दगडाला धडकून काही दुकानांना धडकून दुकानांना धडकत काही दुकाने तोडत पुढे दगड बसखाली अडकल्याने थांबली गेली, या अपघाताचा वेग इतका भयंकर होता.
कि काही सेकंदात सर्व घडले व अपघातातील काही व्यक्तींचे अवयव रस्त्यावर उडून पडले होते, सदर घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत येथील वाहनकोंडी सुरळीत केली.
घडलेल्या या घटनेत कोंढापुरीचे माजी सरपंच शामराव लोखंडे, रामचंद्र वाघमोडे दोघे रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कुंडलिक गायकवाड, मंगलसिंग पवार दोघे रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे तसेच बसचालक अशोक मते रा. इकोगरम सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे हे तिघे जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.