Tere Ishq Mein : धनुष आणि क्रिती सॅनेन या फ्रेश जोडीच्या ‘तेरे इश्क में’ चित्रपटाची जादू केवळ भारतातच सीमित राहिली नसून ती या वीकेंडनंतर जगभरात पोहचली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘तेरे इश्क में चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद चित्रपटाला दिला आहे. या चित्रपटाची सुरुवात बॅाक्स अॅाफिसवर संथ गतीने झाली असली, तरी आठवड्याच्या शेवटी मात्र चित्रपटाने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे बॅाक्स अॅाफिसवर चित्रपटाचा बोलबाला आहे. आता या चित्रपटाच्या बॅाक्स कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतात सुमारे ७१ कोटी रुपयांची कमाई केली असून परदेशातील प्रेक्षकांकडून प्रेम चित्रपटाला मिळत आहे. २२ कोटी रुपयांची ओपनिंग कमाई चित्रपटाने केली. मात्र, चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत जगभरात मोठी कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील होण्यापासून किती दूर आहे याबाबत माहिती समोर आली आहे. ‘तेरे इश्क में’ या रोमँटिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ‘गुस्ताख इश्क‘ चित्रपटाला बॅाक्स अॅाफिसवर चांगली टक्कर दिली आहे. पहिल्या दिवशी जगभरात २२ कोटी, दुसऱ्या दिवशी २१ कोटी कमाई चित्रपटाने केली होती, परंतु आठवड्याच्या शेवटी आधीच ४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई चित्रपटाने केली. साकांलिक. कॉमच्या वृत्तानुसार, सोमवारपर्यंत चित्रपटाने जगभरात अंदाजे ७७.७५ कोटींची कमाई केली आहे. रविवार आणि सोमवारी “तेरे इश्क में” चे एकूण कलेक्शन ३२ कोटींवर पोहोचले आहे. परदेशात ६ कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. १०० कोटी क्लबमध्ये सामील होण्यासाठी चित्रपटाला फक्त २३ कोटींची कमाई करणे आवश्यक आहे. धनुष आणि क्रिती सेनन स्टारर “तेरे इश्क में” हा चित्रपट ‘रांझणा‘ चा सिक्वेल असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाची कथा एका प्रियकराभोवती फिरते, जो प्रेमासाठी कोणत्याही गोष्टीचा त्याग करायला तयार असतो. या रोमँटिक अॅक्शन ड्रामा चित्रपटात धनुष शंकरची व्यक्तरेखा साकारली आहे. क्रिती मुक्तीच्या भूमिकेत आहे. हेही वाचा : लग्नात ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून दिले ‘हेल्मेट’ ; सोशल मीडियावर उपक्रमाची चर्चा अन् कौतुक