टेनिस स्पर्धा : नाव्या, अंजलीचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा

पुणे – पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात नाव्या भामदीप्ती, अंजली निंबाळकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत बिगरमानांकित नाव्या भामदीप्ती हिने सातव्या मानांकित यशिका बक्षीचा 6-2 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अंजली निंबाळकर हिने आठव्या मानांकित राजलक्ष्मी देसाईचा 6-1 असा सहज पराभव करून विजयी आगेकूच केली.
दुसऱ्या मानांकित सिद्धी खोतने श्रावणी पत्कीवर 6-1 असा विजय मिळविला. 12 वर्षांखालील मुलांच्या गटात अभिराम निलाखे, अद्विक नाटेकर, अर्णव बनसोडे, ध्रुव डोगरा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

14 वर्षांखालील मुली:

कश्‍वी राज(15)वि.वि.आदिती हरिप 6-2; नाव्या भामदीप्ती वि.वि.यशिका बक्षी(7) 6-2; काव्या कृष्णन(3)वि.वि.डेलिशा रामघट्टा 6-4; निशिता देसाई(13)वि.वि.एस प्राची 6-2; रितिका मोरे(11)वि.वि.श्रीया रुगे 6-0; अलिना शेख(5)वि.वि.कनिका बाबर 6-2; अनिका शहा(9)वि.वि.दुर्गा बिराजदार 6-3;
समृद्धी भोसले(4)वि.वि.गीतांजली उमप 6-1; अंजली निंबाळकर वि.वि.राजलक्ष्मी देसाई (8) 6-1; सिद्धी खोत(2)वि.वि.श्रावणी पत्की 6-1.

12 वर्षांखालील मुले (तिसरी फेरी) : अभिराम निलाखे(1)वि.वि.आदित्य कामत 6-1; अद्विक नाटेकर(2)वि.वि.विराज बर्वे 6-0; अर्णव बनसोडे(5)वि.वि.अर्णव सिंग 6-3; ध्रुव डोगरा वि.वि.वरद उंडरे 6-5(3).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.