टेनिस स्पर्धा : मृणाल शेळके, श्रावणी देशमुख यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा

पुणे – 12 वर्षाखालील मुलींच्या गटात मृणाल शेळके, श्रावणी देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत येथे होत असलेल्या पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकित मृणाल शेळके हिने अव्वल मानांकित अनुष्का भोलाचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली.

श्रावणी देशमुख हिने तिसऱ्या मानांकित वैष्णवी चौहानचा 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. पाचव्या मानांकित दुर्गा बिराजदारने रिशिता पाटीलचा 6-2 असा तर, चौथ्या मानांकित अंजली निंबाळकरने स्वरा कोहलीचा 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्णव ओरुगंती, हर्ष ठक्कर, अर्जुन किर्तने, सार्थ बनसोडे, प्रणव इंगोळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

सविस्तर निकाल:

12 वर्षाखालील मुली : उप-उपांत्यपूर्व फेरी – मृणाल शेळके वि.वि. अनुष्का भोला (1) 6-4, दुर्गा बिराजदार (5) वि.वि. रिशिता पाटील 6-2,
अंजली निंबाळकर (4) वि.वि. स्वरा कोहली 6-3, रितिका मोरे (8) वि.वि. वी.आद्यथाया 6-3, इशा मोहिते (6) वि.वि. शौर्या सूर्यवंशी 6-0,
श्रावणी देशमुख वि.वि. वैष्णवी चौहान (3) 6-3, निशिता देसाई वि.वि. अनन्या देशमुख 6-3, गायत्री मिश्रा (2) वि.वि. सानिया कान्हेरे 5-2सामना सोडून दिला.

14 वर्षाखालील मुले – दुसरी फेरी – अर्णव ओरुगंती (1) वि.वि. शंतनु चपरिया 6-1, अमोद सबनीस वि.वि. ऋषिकेश बर्वे 6-2, अनिश रांजळकर (5) वि.वि. अवजीत नाथन 6-0, सार्थ बनसोडे (4) वि.वि. अर्जुन परदेशी 6-3, अर्जुन किर्तने (15) वि.वि. आदित्य रानवडे 6-0,
आदित्य भटवेरा (9) वि.वि. अनिमेश जगदाळे 6-3, हर्ष ठक्कर (7) वि.वि. आदित्य आयंगर 6-1, प्रणव इंगोळे वि.वि. पार्थ काळे 6-0.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.