फिनआयक्‍यू करंडक राज्य मानांकन टेनिस स्पर्धा : आदित्य, मिहीर, अंशूल यांची आगेकूच

पुणे – आदित्य योगी, मिहीर कदम, अंशूल पुजारी, विरेन चौधरी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून येथे होत असलेल्या नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्‍यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आगेकूच केली.

मेट्रोसिटी स्पोर्टस क्‍लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य योगीने निहाल तुराकियावर 6-5(5) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. मिहीर कदम याने कुशाग्रा बेडेकरचा टायब्रेकमध्ये 6-5(3) असा पराभव केला. विरेन चौधरी व अंशूल पुजारी यांनी अनुक्रमे अचिंत्य कुमार व आरव मुळे यांचा 6-3 अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली. अर्जुन परदेशी याने शौर्य बोऱ्हाडेला 6-0 असे पराभूत केले.

स्पर्धेचे उदघाटन फिनआयक्‍यूच्या क्रीडा समितीचे चेअरमन राजवीर सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.