पीवायसी ब, एफसी अ, महाराष्ट्र मंडळ उपांत्यपूर्व फेरीत

पुणे  -पीवायसी ब, एफसी अ, महाराष्ट्र मंडळ, लॉ कॉलेज लायन्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून येथे होत असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब अजिंक्‍यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी ब संघाने एसपी कॉलेज 2 संघाचा 24-05 असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पीवायसी ब संघाकडून हिमांशू गोसावी, योगेश पंतसचिव, अनुप मिंडा, अमित लाटे, सुंदर अय्यर, सारंग पाबळकर, रघुनंदन बेहेरे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

दुसऱ्या सामन्यात संजय रासकर, संग्राम चाफेकर, गणेश देवखिळे, पुष्कर पेशवा, पंकज यादव, वैभव अवघडे, सचिन साळुंखे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एफसी अ संघाने पीवायसी क संघाचा 24-07 असा पराभव करून आगेकूच केली. अन्य लढतीत महाराष्ट्र मंडळ संघाने एसपी कॉलेज 1 संघाचा 17-14 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. लॉ कॉलेज लायन्सने डेक्कन 3 संघाला 24-09 ने पराभूत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.