सांगली जिल्ह्यामध्ये आणखी दहा पॉझिटिव्ह 

सांगली  -जिल्ह्यात आणखी दहा व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. करोनाबाधितांमध्ये शिराळा तालुक्‍यातील 5, कडेगाव तालुक्‍यातील 2, आटपाडी तालुक्‍यातील 1, जत तालुक्‍यातील 1, तासगाव तालुक्‍यातील 1 आणि अन्य 1 अशा दहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 122 वर पोहचली आहे.

तासगावमधील गोटेवाडी रस्ता येथील एका महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला दि. 23 रोजी मुंबईतून तासगावमध्ये आली होती. तसेच शिराळा तालुक्‍यातील मणदूर येथील एका कुटुंबातील 4 जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच रिळे येथील एका अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. कडेगाव तालुक्‍यातील नेर्लीमधील दोघे पॉझिटिव्ह   झाले आहेत.

यासह आटपाडी आणि जत तालुक्‍यातील प्रत्येक एक व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जत येथील करोनाबाधिताच्या पुतण्यालाही करोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईत अडकलेल्या मजुरांना छत्तीसगड येथे सोडण्यासाठी जिल्ह्यातील आटपाडी आगारातून 4 बसेस व 10 चालक मुंबईला गेले होते. मजुरांना छत्तीसगड येथे सोडून चालक आटपाडीला परतले होते. यापैकी एका चालकास करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अन्य 9 जणांचे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. करोनाबाधित दहांपैकी चार व्यक्ती या शिराळ्यातील मणदूर येथील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.