Telangana Election Result 2023: तेलंगणात ओवेसींना धक्का; महत्त्वाच्या जागांवर उमेदवार पिछाडीवर

Telangana Election Result 2023: AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाला तेलंगणात मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. काँग्रेस 67 जागांवर आणि बीआरएस 37 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे. ओवेसींचा पक्ष सर्व जागांवर पिछाडीवर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 7 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसींना चांगलाच धक्का बसला आहे.
सध्या ओवेसींचा पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहे. ओवेसी हे स्वतः हैदराबादचे खासदार आहेत आणि हा भाग त्यांचा प्रभाव क्षेत्र मानला जातो. यामुळेच त्यांनी या भागात सर्व उमेदवार उभे केले आहेत. त्यांना मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा आहे आणि त्यांच्या बळावर ओवेसी अनेक दिवसांपासून येथे चांगले काम करत आहेत.
ओवेसी यांचे कुटुंब हैदराबाद मतदारसंघातून राजकारण करते. 2018 च्या निवडणुकीत त्यांना या जागेवर सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी BRS ला 119 पैकी 88 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 21 तर एआयएमआयएमला 7 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणकीच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, तेलंगणात AIMIM केवळ चार जागांवर आघाडीवर आहे.
सुरुवातीच्या ट्रेंडनुसार तेलंगणात AIMIM चे आव्हान वाढत आहे. यावेळी ओवेसी यांनी ज्युबली हिल्समध्येही उमेदवार उभा केला आहे, मात्र त्यांना अपेक्षित निकाल मिळताना दिसत नाही. या भागात काँग्रेस आणि भाजपची कामगिरी चांगली होताना दिसत आहे. आता ओवेसींचा हैद्राबादचा बालेकिल्ला त्यांच्या हातातून निसटत चालल्याचे मानले जात आहे.





