Tejaswini Pandit : ‘आई, मला माफ कर!’ तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट
Jyoti Chandekar : ज्योती चांदेकर यांच्या आठवणींना उजाळा

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे 16 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचं निधन झालं. ज्योती चांदेकर यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. चाहत्यांसह कलाकारांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.
काल त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त तेजस्विनी पंडितने एक भावुक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. आई आणि लेकीचे नातं नेहमीच खास असतं, पण आईच्या आठवणीत जगण्याचं दु:ख तेजस्विनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. ज्यात तिने आईचा डायरी वाचनाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत तेजस्विनीने पोस्टमध्ये लिहिलं, “आई, एक वर्ष झालं. तुझ्याशिवाय आयुष्य आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. मला माफ कर. तुला थँक्यूही म्हणता आलं नाही.” तेजस्विनी पंडितच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत ज्योती चांदेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
ज्योती चांदेकर यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकींनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केलं होत.
याशिवाय ‘पाऊलवाट’, ‘सुखांत’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सलाम’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ज्योती चांदेकर यांनी काम केलं. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत त्यांनी साकारलेली पूर्णा आजी ही भूमिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. ही त्यांची शेवटची मालिका ठरली होती.
हेही वाचा:






