तेजस्वी यादवांना मौलाना म्हटल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,’भाजपचे सर्व चिरकुट …’

Tejashwi Yadav on Maulana। वक्फ कायद्यावरून बिहारमधील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. “ते धर्माच्या नव्हे तर कर्माच्या राजकारणावर विश्वास ठेवतात” असे स्पष्टपणे म्हटले आहे.
भाजप प्रवक्त्यांनी व्यासपीठावरून केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “दिल्लीतील सर्व भाजपचे चिरकुट… संघी लोक, दोन दिवसांपासून आम्हाला शिवीगाळ करत आहेत. ते कधी आम्हाला ‘नमाजवादी’ म्हणत आहेत, तर कधी ‘मौलाना’.”म्हणत त्यांच्यावर टीका केली.
तेजस्वी यादव बापू सभागृहात आयोजित अब्दुल कय्युम अन्सारी यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की,”आम्ही मुद्द्यांवर बोलतो, ते मृत लोकांबद्दल बोलतात. द्वेष पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.”
‘आम्ही मंदिरासोबतच मशीदही सजवू…’ Tejashwi Yadav on Maulana।
तेजस्वी यादव म्हणाले, “आम्ही धर्माच्या नावावर नाही तर कामाच्या नावावर आमची ओळख बनवू. आम्ही मंदिरासोबतच मशीदही सजवू, जनतेशी आमचे नाते फक्त राजकारणाचे नाही तर भावनांचे आहे. जेव्हा आमच्या समस्या सारख्याच असतील, तेव्हा आम्ही वेगळे कसे होऊ शकतो? जर आम्हाला जनतेचा पाठिंबा मिळाला तर आम्ही नागपूरमधून चालणाऱ्या सरकारला आणि नागपूरिया कायद्याला सत्तेवरून बाहेर काढण्यासाठी काम करू.”
वाद का वाढला?
हा संपूर्ण वाद गेल्या रविवारी सुरू झाला जेव्हा तेजस्वी यादव यांनी पाटण्यातील गांधी मैदानात आयोजित ‘वक्फ बचाओ, संविधान बचाओ’ रॅलीला संबोधित करताना केंद्र सरकारने लागू केलेल्या वक्फ कायद्यावर तीव्र विधान केले. ते म्हणाले की, “बिहारमधील सध्याचे सरकार सत्तेबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. जर राज्यात विरोधी पक्षांचे सरकार स्थापन झाले तर वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला जाईल.” भाजप या मुद्द्यावर तेजस्वी यादववर हल्ला करत आहे.
गौरव भाटिया यांनी तेजस्वींना मौलाना म्हटले Tejashwi Yadav on Maulana।
तेजस्वी यादव यांच्या विधानानंतर भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी तेजस्वी यादवांवर थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले, “तेजस्वी यादव या देशाला इस्लामिक देश बनवू इच्छितात. त्यांना शरिया कायदा लागू करायचा आहे. मौलाना तेजस्वी यादव यांना संविधान माहित नाही. पुढील ५० वर्षे बिहारमध्ये राजद सत्तेत येणार नाही. आंबेडकरजी आमच्यासाठी आदरणीय आहेत. तेजस्वी यादव आणि लालू यादव जातीय राजकारण करतात. ते हिंदू आणि मुस्लिम राजकारण करत आहेत.”





