पटना – लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी ‘लालू-राबडी’ या आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) कडून शिवहार आणि जहानाबाद या दोन लोकसभा जागांची मागणी देखील केली आहे.
#Bihar: Tej Pratap Yadav launches 'Lalu Rabri Morcha' in Patna, says, "We demand two Lok Sabha seats of Sheohar and Jehanabad." pic.twitter.com/2xCTUXg2mg
— ANI (@ANI) April 1, 2019
माध्यमांशी संवाद साधताना तेज प्रताप यादव म्हणाले की, ‘सारण लोकसभा मतदार संघातून आमच्या कुंटुंबातील सदस्य जिंकत आले आहेत. या मतदार संघातून माझी आई राबडी देवी यांना निवडणुकीत उमेदवारी द्यावी अन्यथा मी स्वत: येथून निवडणुक लढवेल’.
आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) ने सारण लोकसभा मतदार संघातून माजी मुख्यमंत्री दारोगा राय यांचा मुलगा आणि तेज प्रताप यादव यांचे सासरे ‘चंद्रिका राय’ यांना उमेदवारी दिली आहे.
तेज प्रताप यादव यांनी भाजपवर टीका करताना भारतीय जनता पक्षाचे लोक हे माझा भाऊ तेजस्वी यादव याला भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोपदेखील यावेळी केला आहे.