मोदींच्या हत्येवरील ‘त्या’ वक्तव्यावरून तेज बहादूर यांचा युटर्न

नवी दिल्ली – बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेल्या तेज बहादूर यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढण्यासाठी अर्ज भरणारे माजी जवान तेजबहादूर यादव यांच्या व्हिडीओवरून खळबळ उडाल्यानंतर त्यांनी यू टर्न घेतला आहे. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती मीच असलाे तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबद्दल आपण काहीच बोललो नव्हतो असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच हा व्हिडीओ एडीट केला असून त्यात फेरफार करण्यात आल्याचा दावाही यादव यांनी केला आहे.

या व्हिडिओमध्ये तेजबहादूर यादव पैशांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासही तयार असल्याचे सांगताना दिसत आहेत. शहजाद पूनावाला यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ 2017 सालातील मे -जून मधला असून त्यावेळी निवडणूक लढवण्याचा आपला विचारही नव्हता, असे स्पष्टीकरण देत यादव यांनी या व्हिडीओचा भाजप गैरवापर करत असल्याचा आरोप केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.