सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे तिस्ता धरण वीज केंद्र उद्ध्वस्त, पाहा VIDEO

Sikkim landslides | पूर्व सिक्कीमधील बलुतर येथे मंगळवारी सकाळी भूस्खलन झाले. टेकडीचा मोठा भाग घसरला आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तीस्ता स्टेज ५ धरणाचे पॉवर स्टेशन ढिगाऱ्याखाली गेले. गेल्या काही आठवड्यांपासून येथे सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सतत भूस्खलन होत असल्याने वीज केंद्र काही दिवसांपूर्वी रिकामे करण्यात आले होते. या भूस्खलनात मोठे दगड पॉवरहाऊसच्या दिशेने वेगाने पडत असल्याचे दिसत आहे. वीज केंद्राजवळ काम करणाऱ्या लोकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये खडकाचा एक भाग घसरून अचानक वीज केंद्रावर पडताना दिसत आहे. त्यानंतर पॉवर स्टेशन एका मिनिटात उद्ध्वस्त झाले. Sikkim landslides |
A massive landslide hit the NHPC Teesta Stage V Power House in Sikkim.#ViralVideo #Viral #Landslide #Sikkim #PowerCorridors pic.twitter.com/6S1l7llDQG
— POWER CORRIDORS (@power_corridors) August 20, 2024
दरम्यान, भूस्खलनामुळे १७-१८ घरांचेही नुकसान झाले, रहिवाशांच्या नुकसानीबरोबरच परिसरातील वीज प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या वर्षी जून महिन्यात सिक्कीममध्ये मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले होते. मुसळधार पावसामुळे तीस्ता नदीला पूर आला होता. तर ऑक्टोबर 2023 मध्ये सिक्कीममध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झाला होता. यामुळे लोनाक ग्लेशियल लेक ओव्हरफ्लो झाला. ढगफुटीमुळे सिक्कीमचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, चुंगथांग येथील तीस्ता धरणाचा काही भाग वाहून गेला होता.
हेही वाचा:





