Induction Stove: इंडक्शनवरील गोल वर्तुळाचा मोठा उपयोग! योग्य वापराने वाचेल वीज आणि वाढेल चुलीचे आयुष्य
Induction Stove इंडक्शन चुलीवर दिसणारे गोल वर्तुळ म्हणजे कुकिंग झोनची मर्यादा असते. या वर्तुळाखाली तांब्याची किंवा अॅल्युमिनियमची गोलाकार कॉइल बसवलेली असते. ही कॉइलच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करते, ज्यामुळे भांडे गरम होते. त्यामुळे भांडे नेमकं या वर्तुळाच्या मध्यभागी ठेवलं, तर उष्णता थेट भांड्यात जाते आणि ऊर्जा वाया जात नाही.

Induction Stove: घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींमुळे अनेकजण आता इंडक्शन चुलीकडे वळत आहेत. पण या इंडक्शन चुलीवर दिसणाऱ्या काचेवरील गोल वर्तुळाचा नेमका उपयोग काय, हे अनेकांना माहिती नसते. प्रत्यक्षात हे वर्तुळ फक्त डिझाइन नसून त्यामागे एक महत्त्वाची तांत्रिक रचना लपलेली असते, जी वीज बचतीसाठी खूप उपयोगी ठरते.
इंडक्शन चुलीवर दिसणारे गोल वर्तुळ म्हणजे कुकिंग झोनची मर्यादा असते. या वर्तुळाखाली तांब्याची किंवा अॅल्युमिनियमची गोलाकार कॉइल बसवलेली असते. ही कॉइलच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करते, ज्यामुळे भांडे गरम होते. त्यामुळे भांडे नेमकं या वर्तुळाच्या मध्यभागी ठेवलं, तर उष्णता थेट भांड्यात जाते आणि ऊर्जा वाया जात नाही. Induction Stove
जर भांडे खूप लहान किंवा खूप मोठं असेल किंवा ते योग्य ठिकाणी ठेवलेलं नसेल, तर इंडक्शनला भांडं ओळखण्यासाठी जास्त ऊर्जा वापरावी लागते. त्यामुळे वीजेचा वापर वाढतो आणि बिलही जास्त येऊ शकतं. उलट, योग्य आकाराचं भांडं आणि तेही वर्तुळाच्या अगदी मध्यभागी ठेवलं, तर जवळपास ९० टक्के ऊर्जा थेट स्वयंपाकासाठी वापरली जाते. Induction Stove
Induction Stove
याचा आणखी एक फायदा म्हणजे स्वयंपाक लवकर होतो. जेवण पटकन तयार झालं की इंडक्शन कमी वेळ चालतं, त्यामुळे वीजही कमी खर्च होते. म्हणजेच, योग्य पद्धतीने इंडक्शन वापरल्यास वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते.
इंडक्शनवरील हे वर्तुळ सुरक्षिततेसाठीही महत्त्वाचं असतं. या वर्तुळाखाली सेन्सर्स बसवलेले असतात, जे भांड्याची योग्य पोझिशन ओळखतात. जर भांडं चुकीच्या ठिकाणी ठेवलं, तर इंडक्शनमधील सर्किट किंवा कॉइल गरम होऊ शकते. त्यामुळे शॉर्ट सर्किट किंवा मशीन खराब होण्याचा धोका वाढतो. योग्य वापर केल्यास इंडक्शन चुलीचं आयुष्यही वाढतं. Induction Stove
इंडक्शन चुलीचे इतरही अनेक फायदे आहेत. यात उघडी ज्वाला नसल्यामुळे आग लागण्याचा धोका कमी असतो. तसेच, ही चुल फक्त भांडं गरम करते, त्यामुळे स्वयंपाकघरात जास्त उष्णता निर्माण होत नाही. स्वच्छता करणेही सोपं असतं, कारण याचा पृष्ठभाग सपाट असतो. शिवाय, ऑटो-कट आणि टाइमर सारख्या सुविधा असल्यामुळे दूध उतू जाणे किंवा भाजी जळणे याची चिंता राहत नाही.
एकूणच, इंडक्शनवरील छोटंसं गोल वर्तुळ खूप मोठं काम करतं. त्याचा योग्य वापर केल्यास वीज बचत, सुरक्षितता आणि चुलीचं दीर्घ आयुष्य या तिन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात.





