Bollywood News : वरुण तेज-मानुषी छिल्लरच्या ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ धमाकेदार टिझर रिलीज

Manushi Chhillar – साऊथ अभिनेता वरुण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर यांच्या ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. पुढील वर्षी 16 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा एक देशभक्तीपर चित्रपट असून त्यात हवाई दलातील वीरांची आव्हाने दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि प्राणघातक हवाई हल्ल्यांपैकी एकाचा मुकाबला करण्यासाठी हवाई दलातील वीरांच्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे.
सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन आणि संदीप मुड्डा यांच्या रेनेसान्स पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंग हाडा यांनी केले आहे. ‘वंदे मातरम’ वरून प्रेरित पार्श्वसंगीतासह हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणार आहे. या चित्रपटाची कथा आघाडीवर तैनात असलेल्या आपल्या हवाई दलातील वीरांच्या शौर्यावर आणि देशाचे रक्षण करताना त्यांना येणाऱ्या आव्हानांवर आधारित आहे.
‘वंदे मातरम’ वरून प्रेरित पार्श्वसंगीतासह हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणार आहे. या चित्रपटाची कथा आघाडीवर तैनात असलेल्या आपल्या हवाई दलातील वीरांच्या शौर्यावर आणि देशाचे रक्षण करताना त्यांना येणाऱ्या आव्हानांवर आधारित आहे.
वरुण तेजच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘मटका’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करुण कुमार यांनी केले असून यात नोरा फतेही दिसणार आहे. ‘मटका’ तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटात विकी कौशलसोबत अखेरची दिसलेली मानुषी छिल्लर आता ‘तेहरान’ या अॅक्शनपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.





