बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याचा आगामी “गणपत’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यात “बागी’प्रमाणेच टायगरचा धडाकेबाज अंदाज दिसून येत आहे.
हा अंदाज टायगरच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. टायगरने नुकतच त्याच्या ट्विटरवर “गणपत’चा टीझर शेअर केला आहे. या टीझरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
विकास बहल द्वारा दिग्दर्शित “गणपत’मध्ये टायगर हा एका बॉक्सरची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याने ट्रेनिंगही घेतले होते. ट्रेनिंगचा एक व्हिडीओ देखील टायगरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. “गणपत’मध्ये टायगरसह नुपूर सॅनॉन आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुपूर सॅनॉन या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
दरम्यान, अनलॉकनंतर बॉलीवूडमधील शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले असून, पुन्हा काम सुरू करण्यासाठी सुपरस्टार आपले आगामी वेळापत्रक ठरवत आहेत. यात टायगर देखील पुन्हा वापसी करण्यास सज्ज झाला असून तो सलग 3 धमाके करणार आहे. टायगरच्या “गणपत’, “हिरोपंती-2′ आणि “रॅम्बो’ या चित्रपटांचे प्लॅनिंग तयार झाले आहे.