महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटनेवर आधारित ‘मानवत मर्डर्स’ वेब सीरीजचा टीझर प्रदर्शित

महाराष्ट्र हादरवणाऱ्या घटनेवर आधारित ‘मानवत मर्डर्स’ वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या क्राइम थ्रिलर वेब सीरीजचा टीझर सध्या लॉन्च करण्यात आला आहे. सोनी लिव्हवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. मानवत मर्डर्स वेब सीरिज 70 च्या दशकातील भयानक हत्याकांडावर आधारित आहे.
‘हे’ कलाकार साकारणार महत्वाची भूमिका
भारताचे शेरलॉक होम्स म्हणून ओळखले जाणारे सीआयडीमधील प्रतिष्ठित डिटेक्टिव्ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्मचरित्रात्मक कलाकृती ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम’वर आधारित ही वेब सिरीज आहे. या सीरीजमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर असे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
काय आहे वेबसीरिजमध्ये?
आशिष बेंडे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘मानवत मर्डर्स’ आगामी सीरीजमध्ये एका भयानक हत्याकांडाचा उलगडा होणार आहे. या हत्याकांडाने 70 च्या दशकात देशाला हादरून टाकलं होतं. रमाकांत एस. कुलकर्णी यांच्या नेतृत्वांतर्गत तपास पथक या खटल्याची तपासणी करताना पाहायला मिळणार आहे. आशुतोष गोवारिकर रमाकांत कुलकर्णी यांच्या भूमिकेत या गुंतागूंतीच्या केसचा उलगडा करताना दिसतील.
कधी रिलीज होणार वेबसिरीज
‘मानवत मर्डर्स’ वेब सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर असे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 4 ऑक्टोबरला ‘मानवत मर्डर्स’ ही वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर रिलीज होणार आहे.





