#TeamIndia : ऋषभ पंत तंदुरुस्त ठरला
Updated On:

लंडन – करोनातून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पूर्ण तंदुरुस्त झाला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर मिळालेल्या सुट्टीदरम्यान पंतला करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
हा कालावधी पूर्ण करत पंत संघाच्या बायोबबलमध्ये दाखल झाला होता. आता त्याची तंदुरुस्ती सिद्ध झाली असून तो मंगळवारपासून संघाच्या सराव सत्रातही सहभागी होणार आहे. त्याच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.





