Dr. Manmohan Singh : भारतीय संघाने मैदानातून वाहिली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली, काळी पट्टी बांधून मैदानात उतरले खेळाडू

Australia vs India 4th Test : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. विविध स्तरातून माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भारतीय क्रिकेट संघाने देखील मेलबर्नच्या मैदानातून त्यांनी श्रद्धांजली अपर्ण केली.
सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
The Indian Cricket Team is wearing black armbands as a mark of respect to former Prime Minister of India Dr Manmohan Singh who passed away on Thursday. pic.twitter.com/nXVUHSaqel
— BCCI (@BCCI) December 27, 2024
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी भारतीय संघ बॉक्सिंग डे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
अनेक क्रिकेटपटूंनी ट्विट करत मनमोहन सिंह यांनी श्रद्धांजली अपर्ण केली. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंह यांनी ट्विटरवरून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. ते भारताच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम करणारे एक दूरदर्शी नेते आणि खरे राजकारणी होते. त्यांची बुद्धी आणि नम्रता नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या संवेदना’, असे ट्विट करत युवराज सिंहने दुःख व्यक्त केले.
Sad news of the passing of Dr. Manmohan Singh Ji. A visionary leader and a true statesman who worked tirelessly for India’s progress. His wisdom and humility will always be remembered. My heartfelt condolences to his loved ones. 🙏 #ManmohanSingh ji
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) December 26, 2024
My heartfelt condolences on the passing away of our former Prime Minister Shri Manmohan Singh ji.
Om Shanti 🙏🏼 pic.twitter.com/uPkmiCm5C4— Virender Sehwag (@virendersehwag) December 26, 2024
Saddened by the news of sudden demise of former Prime Minister, a thorough gentleman, and a visionary leader, Dr. Manmohan Singh Ji 💔💔What truly set him apart was his calm and steady leadership in times of crisis, his ability to navigate complex political landscapes, and his… pic.twitter.com/WKbjrnADJQ
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 26, 2024
‘माजी पंतप्रधान, एक सज्जन आणि दूरदृष्टी असलेला नेता, डॉ. मनमोहन सिंगजी यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने दुःखी झालो. संकटकाळातीस त्यांचे शांत आणि स्थिर नेतृत्व, जटिल राजकीय मार्गक्रमण करण्याची त्यांची क्षमता त्यांना वेगळे बनवते. त्यांच्या योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबिय आणि नातेवाईकांप्रती माझ्या मनापासून संवेदना., असे आपल्या पोस्टमध्ये लिहित हरभजन सिंहने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 2004 ते 2014 अशी सलग 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. आरबीआयचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले.





