#NZvIND 2nd ODI : दुस-या वन-डे साठी भारतीय संघात दोन बदल

आॅकलंड : भारत-न्यूझीलंड दरम्यान दुसरा सामना आज होत आहे. न्यूझीलंडने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघासाठी दुसरा सामना ‘करो या मरो’ अशा स्थितीत आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे. भारताच्या ११ सदस्यीय संघात दोन बदल केले गेले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना संघातून वगळण्यात आलं आहे. मागील सामन्यात खराब कामगिरी करूनही शार्दुल ठाकूरला संघात कायम ठेवण्यात आलं आहे. युजवेंद्र चहल मात्र संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय संघ : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, केदार जाधव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, युज़वेंद्र चहल, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह
2nd ODI. India XI: P Shaw, M Agarwal, V Kohli, S Iyer, KL Rahul, K Jadhav, R Jadeja, S Thakur, N Saini, J Bumrah, Y Chahal https://t.co/8PgGQpPrrF #NZvInd
— BCCI (@BCCI) February 8, 2020
दुसरीकडे न्यूझीलंड संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. मिशेल सॅटनरच्या जागी मार्क चैपमैनचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर, कायले जैमीसन हा आजच्या सामन्यातून आपल्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.
न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, हेनरी निकोल्स, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, टॉम लाथम, जेम्स नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मार्क चैपमैन, काइल जेमीसन, टिम साउदी, हेमिश बेनेट
2nd ODI. New Zealand XI: H Nicholls, M Guptill, M Chapman, T Blundell, R Taylor, T Latham, J Neesham, C de Grandhomme, T Southee, K Jamieson, H Bennett https://t.co/8PgGQpPrrF #NZvInd
— BCCI (@BCCI) February 8, 2020
दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताने ३४८ धावांचे विशाल लक्ष्य देऊनही न्यूझीलंडने विजय मिळवला होता आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिकूंन भारत मालिकेत बरोबरी साधणार की न्यूझीलंड मालिकेत विजयी आघाडी घेणार, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.





