ICC Test Ranking : आयसीसी कसोटी संघांची क्रमवारी जाहीर; टीम इंडियाची ‘एवढ्या’ स्थानांनी झाली घसरण

आयसीसीने नुकतीच कसोटी संघाची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अनेक बदल पाहायला मिळाले. या क्रमवारीत टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. कसोटी संघांचा एक प्रकारे लेखाजोखा मांडला आहे. जाणून घेऊया कोणता संघ क्रमवारीत कितव्या स्थानी आहे.
कसोटी क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियन संघ 4531 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या संघाने दोन वर्षात खेळलेल्या 17 कसोटीपैकी 11 सामन्यात विजय, चार सामन्यात पराभव आणि 2 सामने ड्रॉ राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 63.73 इतकी आहे. ऑस्ट्रेलियाचे रेटिंग पॉईंट 126 आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ या क्रमवारीनुसार 3355 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत 69.44 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे.दक्षिण आफ्रिकेचे रेटिंग पॉईंट 112 आहेत.
टीम इंडियाची नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत घसरण झाली आहे. टीम इंडियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. टीम इंडियाला दोन मालिका गमवल्याने मोठा फटका बसला आहे. इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध 3-0 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 ने मालिका गमावली आहे. 4248 गुणांसह टीम इंडिया तिसऱ्या स्थानी आहे. टीम इंडियाचे रेटिंग पॉईंट 109 आहेत.
इंग्लंड (106) रेटिंगसह चौथ्या स्थानावर, न्यूझीलंड (96) रेटिंगसह पाचव्या स्थानावर, श्रीलंका (87) रेटिंगसह सहाव्या आणि पाकिस्तान (83) रेटिंगसह सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज (75) रेटिंगसह आठव्या, बांगलादेश (65) रेटिंगसह नवव्या आणि आयर्लंड (26) रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहे. तसेच, अफगाणिस्तान (19) रेटिंगसह 11 व्या आणि झिम्बाब्वे (0) रेटिंगसह 12व्या स्थानावर आहे.





