टाकळी हाजी : टीईटी परीक्षा सक्तीच्या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनेने आंदोलन केले. जिल्हा परिषद, खासगी व्यवस्थापन, आश्रमशाळांमधील सर्व शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने निषेध व्यक्त केला. शिक्षकांच्या सेवेसाठी टीईटी बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे, राज्याध्यक्ष अनिलराव पलांडे, मनोज मराठे, विभागीय अध्यक्ष शांताराम नेहेरे, जिल्हाध्यक्ष युवराज थोरात, नारायण करपे, कल्याण कोकाटे, शोभा तिकांडे, प्रणिती लोंढे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अपर्णा देशपांडे यांनी निवेदन स्वीकारले. शिक्षकांनी सांगितले की, एक ते सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने अल्पसंख्यांक शिक्षण संस्थेच्या खटल्यावर निकाल देताना सर्व शिक्षकांना सेवा टिकवण्यासाठी टीईटी परीक्षा आणि बरे असल्याचे म्हटले आहे. मोर्चात महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्राचे पदवीधर व केंद्रप्रमुख संघटना जुनी पेन्शन हक्क संघटना शिक्षक भारतीय अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ मागासवर्गीय शिक्षक संघटना यांच्यासह अनेक विविध संघटना विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. शासनाने शिक्षकांचा अंत पाहू नये. पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करून शिक्षकाचे युक्तिवाद मांडावे. केंद्र सरकारकडे आरटीआय कायदा सुधारणा करण्याची शिफारस करून हिवाळी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मंजूर करावे; अन्यथा सर्व शिक्षकांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. – ॲड. युवराज थोरात, जिल्हाध्यक्ष पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे.