टीडीएस फॉर्म आता अधिक व्यापक
Updated On:
नवी दिल्ली – आयकर विभागाने टीडीएस म्हणजेच टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स प्रणालीच्या अर्जात फेरबदल केले असून हा अर्ज आता अधिक व्यापक स्वरूपाचा करण्यात आला आहे. ज्यांच्या व्यवहारातून हा कर कापला जात नाहीं त्याचे कारण या अर्जात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
एक कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढली गेल्यास त्याची माहिती देण्याची सुचनाहीं बॅंकांना करण्यात आली आहे. ई कॉमर्स ऑपरेटरांनाहीं आता टीडीएस लागू करण्यास सांगण्यात आले आहे. म्युच्युअल फंडांद्वारे वाटला जाणारा लाभांश, व्यापारी विश्वस्त संस्था, व्यावसायिक फी, यासाठीही आता टीडीएस लागू करण्यात आला आहे.





