‘मुलगा झाला तर गाय, मुलगी झाल्यास 50 हजार रुपये देणार’, लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘या’ खासदारने दिले विचित्र आश्वासन

Appalanaidu Kalisetti | आंध्र प्रदेश हे राज्य लोकसंख्या वाढीला सातत्याने प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहे. एकीकडे देशाची लोकसंख्या प्रचंड वाढीला असताना, दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्ये जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिक मुलं जन्माला घाला असं आवाहन नागरिकांना केले होते. आता त्यांच्याच तेलुगु देसम पार्टीचे खासदार कालीसेट्टी अप्पलानायडू यांनी लोकसंख्या वाढीबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
अप्पलानायडू यांनी आश्वासन दिले आहे की, तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्या महिलांना 50 हजार रुपये अथवा गाय दिली जाणार आहे. त्यांच्या या विचित्र आश्वासनाची सध्या जोरदार चर्चा रंगली आह.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बोलताना अप्पलानायडू म्हणाले की, महिलेने तिसऱ्या बाळाला जन्म दिल्यावर मुलगी असल्यास 50 हजार रुपये आणि जर मुलगा असेल तर तिला गाय दिली जाईल.
याआधी आंध्र प्रदेशमधील अनेक नेत्यांनी राज्यातील तरूण लोकसंख्येत घट होत असल्याचे कारण देत लोकसंख्या वाढवण्याचा विचार करावा, असे म्हटले होते. याशिवाय, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अधिक मुलं जन्माला घालणाऱ्या कुटुंबांना सवलती देण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते.
एका वृत्तपत्राशी बोलताना अप्पलानायडू म्हणाले की, लोकसंख्या वाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नायडू यांनी उचललेल्या पावलांनंतर आणि तिसऱ्या अपत्यासाठी दोघांनीही दिलेल्या प्रस्तावांनंतर मी ही घोषणा आहे. आम्ही महिलांना अधिक मुलं जन्माला घालण्यास सांगत आहोत. जर तिसरे मूल झाले तर आम्ही त्यांना प्रोत्साहन स्वरुपात रक्कम देऊ.
त्याआधी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीच्या वेळी प्रसूती रजा दिली जाईल, अशी घोषणा केली होती.





