Natalie Burn : केजीएफ आणि केजीएफ दोननंतर आता रॅाकिंग स्टार यश त्याच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चित्रपटासाठी सज्ज आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणार ट्रेलर प्रदर्शित झाला. यू ट्यूबवर पहिल्या चौवीस तासातच ट्रेलरने धुमाकूळ घातला. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका इंटीमेट सीनची सर्वाधिक चर्चा होत आहे. हा इंटिमेट सीन कारमध्ये दाखवण्यात आला असून ज्यामध्ये एक परदेशी अभिनेत्री यशसोबत दिसत आहे. यशसोबत दिसणारी सुंदरी युक्रेनियन-अमेरिकन हॉलिवूड अभिनेत्री नताली बायर्न आहे. तिने या चित्रपटातून बॅालीवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. युक्रेनमधील कीव येथे नताली बायर्न हिचा जन्म झाला आहे. तिने इंटरनॅशनल चित्रपटांमध्ये अभिनेत्री आणि निर्माती म्हणून काम केले आहे. तिने आपल्या कारकीर्दीची सुरूवात मॉडेलिंगपासून केली आहे. ती एक मार्शल आर्टिस्ट आणि व्यावसायिक बॅले डान्सर देखील आहे. खंरतर या चित्रपटात अनेक अभिनेत्री आहेत, पण सर्वत्र नताली बायर्न ही सर्वाधिक चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात ‘टॉक्सिक‘ टीमने त्यांच्या मुख्य अभिनेत्रींचे लूक आणि पात्रांची नावे जाहीर केली. यामध्ये तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत, नयनतारा, कियारा अडवाणी आणि हुमा कुरेशी या टॅापच्या अभिनेत्रींचा समावेश आहे. आता थेट ट्रेलरमधून टॅाक्सिकच्या टीमने आश्चर्यचकित करत कुठेही चर्चेत नसलेली परदेशी अभिनेत्री नताली बायर्न हिला समोर आणले आहे. त्यामुळे या परदेशी अभिनेत्रीची नेमकी भूमिका काय असणार या विषयी माहिती मिळू शकलेली नाही. हा चित्रपट १९ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक गीतू मोहनदास यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. हेही वाचा :भीषण अपघात ! खालून जाणाऱ्या रेल्वेवर बांधकामाची क्रेन कोसळली ; २२ जणांचा जागीच मृत्यू