लघुउद्योगाची करविषयक माहिती मिळणार
Updated On:

नवी दिल्ली – सूक्ष्म, कुटीर आणि मध्यम उद्योगांची प्राप्तिकर विभागाकडे असलेली माहिती आता हा विभाग लघुउद्योग मंत्रालयाला देणार आहे. जी माहिती दिली जाणार आहे. त्यामध्ये यंत्रसामग्रीचा घसारा, भांडवली गुंतवणूक, कर परतावा व थकबाकी इत्यादीचा समावेश असणार आहे.
त्यामुळे लघुउद्योगांची करविषयक माहिती लघुउद्योग मंत्रालयाला उपलब्ध होईल. त्या आधारावर या उद्योगांना वेळोवेळी कशाची मदत लागणार आहे, याचा अंदाज येऊ शकेल. केंद्र सरकारने लघुउद्योगाची व्याख्या गेल्या महिन्यात विस्तारित केलेली आहे. या उद्योगांची वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे लघु उद्योगाचा अर्थव्यवस्थेतील वाटा वाढेल, असे समजले जाते.





