भगव्या झेंड्याच्या घोषणेवरून तावडेंचा पवारांना टोला

मुंबई: “ज्यांच्यावर न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अश्या लोकांना भगव्याला हात लावण्याचा अधिकार नाही” असा टोला राज्याचे मंत्री विनोद तावडे यानिओ अजित पवारांना लगावला आहे. दरम्यान यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार अशी घोषणा अजित पवारांनी शुक्रवारी पाथरी येथील जाहीर सभेत केली होती.

तावडे म्हणाले की, “अजितदादा तुमच्याकडे एक झेंडा आहे, त्याचाच दांडा पकडायला माणसं राहिली नसताना दूसरा झेंडा कोण खांद्यावर घेणार? तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा घेऊन चालत नाही तर महाराजांनी जे शिकवलं आहे ते तुम्ही अंमलात आणार आहात का? असा प्रश्न देखील उपस्थित केला. त्याचप्रमाणे आपल्या काळात किती घोटाळे झाले हे विसरू नका आणि झेंडा मानाने, प्रेमाने व खंबीरपणे पकडणारा कार्यकर्ता राहिला पाहिजे” असा टोला त्यांनी लगावला आहे.

तर अजित पवारा यांनी आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार आहेत अशी घोषणा केली होती. तसेच यावेळी बोलताना अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका करत हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने पीक विमा मिळत नाहीय. देवेंद्र फडणवीस कधी देणार हमीभाव? असा प्रश्न उपस्थित केला होता.

.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)