Sunil Tatkare : आज २८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार विमानाने बारामतीला येत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातावरून संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवारांनी विमान अपघात प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच त्यांनी नाव न घेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांवरही जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी केलेल्या टीकेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर देत जोरदार निशाणा साधला आहे. “कोण 2019 ला तिकीट मागायला भाजपकडे गेले होते, याची दादांकडे माहिती होती, माझ्याकडे माहिती आहे, ” असे म्हणत सुनील तटकरे (Sunil Tatkare ) यांनी रोहित पवारांचे नाव घेता त्यांच्यावर निशाणा साधाला आहे. Sunil Tatkare दादांना जाऊन एक महिना झाला. आज त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. आमची सुरुवातपासून मागणी आहे. सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री यांना भेटलो त्यांना निवेदन दिले. त्यांनी अमित शाह यांच्याकडे पत्रव्यवहार केला. काही प्रश्न निर्माण केलेत. तपास यंत्रणांनी सखोल तपास करावा, सगळ्या बाजूने तपास करावा. दादांचे निधन झालं त्यावेळी वाहिनींना जबाबदारी द्यावी अशी भूमिका आम्ही घेतली असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे? (Sunil Tatkare) “कुणी दादांवर प्रखर जहरी टीका केली हे लोकांनी अनुभवले आहे. बारामतीत दादांनी सांगितलं होतं की, मी एकटा आहे. कोण 2019 ला तिकीट मागायला भाजपकडे गेले होते, याची दादांकडे माहिती होती, माझ्याकडे माहिती आहे. ” हेही वाचा : Skin Care Tips: कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करायचा आहे? हे ‘३’ सोपे घरगुती उपाय त्वचेला देतील नैसर्गिक उजळपणा