टाटाची लोकप्रिय SUV नव्या रुपात बाजारात दाखल! ‘अॅडव्हेंचर एक्स’ व्हेरिएंटमध्ये Land Rover टच, किंमत ₹18.99 लाखांपासून

TATA NEW SUV : टाटा मोटर्सने आज आपल्या लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल्स — टाटा हॅरियर आणि टाटा सफारीसाठी एक नवीन आणि अत्याधुनिक व्हेरिएण्ट ‘अॅडव्हेंचर एक्स परसोना’ लाँच केली. १८.९९ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या या नव्या व्हेरिएण्टची डिलिव्हरी देशभरात आजपासून सुरू झाली आहे.
ही नवीन परसोना साहस, कार्यक्षमता आणि तांत्रिक वैशिष्ट्यांचा परिपूर्ण संगम असून ग्राहकांना मूल्यवर्धित अनुभव देणारी आहे. अॅडव्हेंचर एक्स व्हेरिएण्टमध्ये सेगमेंट-फर्स्ट फीचर्स — जसे की अॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (AT), 360° HD सराउंड व्ह्यू, ऑटो होल्ड फंक्शनसह EPB, ट्रेल रिस्पॉन्स मोड्स, तसेच लँड रोव्हर प्रेरित कमांड शिफ्टर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर २६.०३ सेमी ट्विन स्क्रिन सिस्टम, मेमरी फंक्शनसह एर्गोनॉमिक ड्रायव्हर सीट, अॅक्वा सेन्स वायपर्स व मल्टी ड्राईव्ह मोड्स ही सुद्धा उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
किंमत आणि व्हेरिएण्ट्सचा तपशील –
टाटाने आज जाहीर केलेल्या सुरुवातीच्या किमती दिल्ली एक्स-शोरूमप्रमाणे पुढीलप्रमाणे आहेत:
| परसोना | हॅरियर किंमत (₹) | सफारी किंमत (₹) |
|---|---|---|
| स्मार्ट | 14,99,990 | 15,49,990 |
| प्युअर एक्स | 17,99,000 | 18,49,000 |
| अॅडव्हेंचर एक्स | 18,99,000 | – |
| अॅडव्हेंचर एक्स+ | 19,34,000 | 19,99,000 |
| फीअरलेस एक्स | 22,34,000 | – |
| फीअरलेस एक्स+ | 24,44,000 | – |
| अॅकॉम्प्लीश एक्स | – | 23,09,000 |
| अॅकॉम्प्लीश एक्स+ (7S) | – | 25,09,000 |
| अॅकॉम्प्लीश एक्स+ (6S) | – | 25,19,000 |
लाँचप्रसंगी *टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, “हॅरियर आणि सफारी केवळ वाहन म्हणून नव्हे, तर एका साहसी जीवनशैलीचे प्रतीक आहेत. नवीन अॅडव्हेंचर एक्स परसोना आधुनिक युगासाठी डिझाइन केली असून ग्राहकांना अधिक प्रीमियम अनुभव देईल. ही परसोना गुणवत्ता, क्षमता आणि अभिव्यक्ती यांचे उत्तम दर्शन घडवते.”
डिझाईन आणि इंजिन कार्यक्षमतेवर भर –
अॅडव्हेंचर एक्स परसोना लँड रोव्हरच्या प्रसिद्ध D8 प्लॅटफॉर्मवर आधारित OMEGARC आर्किटेक्चरवर विकसित करण्यात आली आहे. यात २.० लिटर क्रायोटेक डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला असून ती दमदार परफॉर्मन्स देते. हॅरियरमध्ये R17 टायटन फोर्ज अलॉय व सिग्नेचर मॅस्कॉट आहे, तर सफारीमध्ये R18 अॅपेक्स अलॉय व खास डिझाइन मॅस्कॉट देण्यात आले आहेत.
हॅरियर अॅडव्हेंचर एक्समध्ये टॅन असेंट्स असलेल्या ब्लॅक लेदरेट सीट्स आणि ओनिक्स ट्रेल इंटिरिअर्स, तर सफारी अॅडव्हेंचर एक्समध्ये टॅन ओक इंटिरिअर्ससह लक्झरी डॅशबोर्ड देण्यात आला आहे.
ग्राहकांसाठी आकर्षक संधी –
टाटा मोटर्सने ही अॅडव्हेंचर एक्स परसोना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आकर्षक प्रारंभिक किंमतीत उपलब्ध केली असून ही डील SUV खरेदीस इच्छुक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची संधी ठरू शकते.
टाटाची ही नवीन लाईनअप अधिक स्मार्ट, स्टायलिश आणि कार्यक्षम असून आजच्या SUV ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत अशी आहे. अॅडव्हेंचर एक्स ही या सर्व परसोनांमध्ये सर्वोच्च अभिव्यक्ती मानली जात असून, ती डिझाइन, परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक नवा मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.





