टाटाच्या ‘या’ लोकप्रिय कारला स्वस्तात खरेदीची उत्तम संधी, 45 हजार रुपयांपर्यंतची होईल बचत

Tata Tigor Offer | तुम्ही पुढील काही दिवसात बजेटमधील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी टाटाची एक कार चांगला पर्याय ठरू शकते. टाटा मोटर्स (Tata Motors) त्यांच्या लोकप्रिय सेडान कार टिगोरवर (Tigor) बंपर सूट देत आहे.
टाटा टिगोर खरेदी केल्यास ग्राहकांना जास्तीत जास्त 45 हजार रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी मिळत आहे. ही ऑफर एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लागू आहे. या ऑफरमध्ये डिस्काउंटसोबतच एक्सचेंज बोनसचाही लाभ मिळेल. टाटा टिगोरच्या फीचर्स, पॉवरट्रेन आणि किंमतबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
टाटा टिगोरची किंमत
फीचर्सबद्दल सांगायचे तर टाटाच्या या कारमध्ये 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, रेन सेन्सिंग वायपर आणि ऑटो एसी यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सुरक्षेसाठी कारमध्ये ड्युअल-फ्रंट एअरबॅगसोबत रिअर पार्किंग सेन्सर्स उपलब्ध आहेत.
टाटा टिगोरची बाजारात मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire), ह्युंडाई ऑरा (Hyundai Aura) आणि होंडा अमेझ (Honda Amaze) या कारशी स्पर्धा आहे. या कारची किंमत शोरूम किंमत ६ लाख रुपयांपासून ते ९.५० लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.
टाटा टिगोरमध्ये 1.2-लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 86 बीएचपीची कमाल पॉवर आणि 113 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. याशिवाय, कारमध्ये सीएनजी पॉवरट्रेनचा पर्याय देखील मिळतो. कंपनी टाटा टिगोरच्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 19.28 किमी प्रति लिटर, पेट्रोल ऑटोमेटिक व्हेरियंटमध्ये 19.60 किमी प्रति लिटर, सीएनजी मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 26.40 किमी प्रति किलो तर सीएनजी ऑटोमेटिक व्हेरियंटमध्ये 28.06 किमी प्रति किलो मायलेज देण्याचा दावा करते.
टाटा मोटर्सच्या या आकर्षक ऑफरमुळे बजेटमधील सेडान कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर टाटा टिगोर एक चांगला पर्याय ठरू शकतो. लक्षात घ्या की शहर व डीलरशीपनुसार ऑफर वेगवेगळी असू शकते.





