Tata Harrier And Safari Petrol Variants Prices: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने एसयूव्ही प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. टाटाने आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि शक्तिशाली एसयूव्ही, हॅरियर (Harrier) आणि सफारी (Safari) चे बहुप्रतिक्षित ‘हायपेरियन’ (Hyperion) टर्बो पेट्रोल व्हेरिएंट्स भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केले आहेत. विशेष म्हणजे, टाटाने या गाड्यांची सुरुवातीची किंमत इतकी प्रभावी ठेवली आहे की, यामुळे महिंद्रा आणि ह्युंदाई सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्पर्धात्मक किंमत आणि व्हेरिएंट्स टाटा हॅरियर पेट्रोलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १२.८९ लाख रुपये, तर सफारी पेट्रोलची किंमत १३.२९ लाख रुपये पासून सुरू होते. ही किंमत महिंद्राच्या नवीन XUV 7XO (१३.६६ लाख रुपये) पेक्षाही कमी आहे. हॅरियर पेट्रोलच्या प्रमुख किमती (एक्स-शोरूम): Smart MT (बेस मॉडेल): ₹१२.८९ लाख Pure X MT: ₹१५.९९ लाख Fearless X+ AT: ₹२३.५३ लाख Fearless Ultra Red #DARK AT: ₹२४.६८ लाख सफारी पेट्रोलच्या प्रमुख किमती (एक्स-शोरूम): Smart (बेस मॉडेल): ₹१३.२९ लाख Pure X MT: ₹१६.४९ लाख Accomplished Ultra 6S AT: ₹२४.८४ लाख Accomplished Ultra Red #DARK 6S AT: ₹२५.१९ लाख शक्तिशाली इंजिन आणि हाय-टेक तंत्रज्ञान हॅरियर आणि सफारीच्या या नवीन मॉडेल्समध्ये १.५ लीटर हायपेरियन टर्बो डायरेक्ट इंजेक्शन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १७० हॉर्सपावर आणि २८० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. ग्राहकांना यामध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कंपनीने या इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे गाडी चालवताना कमीत कमी धक्के जाणवतात आणि केबिनमध्ये इंजिनचा आवाज (NVH लेव्हल्स) अत्यंत कमी येतो. मायलेज आणि सुरक्षितता टाटा मोटर्सचा दावा आहे की, हॅरियर आणि सफारी पेट्रोल या त्यांच्या सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या एसयूव्ही आहेत, ज्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये देखील झाली आहे. सुरक्षिततेच्या बाबतीतही टाटाने कोणतीही तडजोड केलेली नाही. या दोन्ही पेट्रोल मॉडेल्सना भारत NCAP कडून ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे या गाड्या कुटुंबासाठी सर्वात सुरक्षित ठरल्या आहेत.