टाटा समूह सुपर ऍप उपलब्ध करणार
Updated On:

मुंबई – भारतातील बलाढ्य रिटेल ई-कॉमर्स बाजारपेठेचा वाटा मिळावा म्हणून देशातील आणि परदेशातील कंपन्या प्रयत्न करीत आहेत. आता टाटा समूह ई-कॉमर्ससाठी एक सुपर ऍप लवकरच जारी करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
टाटा समूहातील टाटा डिजिटल हे सुपर ऍप जारी करणार आहे. यामुळे कंपनीच्या ग्राहक सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होतील.
टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, यामुळे ग्राहकांना अन्न आणि ग्राहक वस्तू, विमा, वित्तीय सेवा, शिक्षण, आरोग्य, बिल पेमेंट इत्यादी सेवा उपलब्ध होतील. रिलायन्स उद्योगसमूह भारतातील रिटेल बाजारपेठेतील मोठा हिस्सा मिळविण्यासाठी रिटेल आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील बलाढ्य ऍमेझॉन कंपनीही सक्रिय झाली आहे.





