Tara Sutaria : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत आहे. काही काळापूर्वी तिचे नाव वीर पहाडियासोबत जोडले गेले होते, पण आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनंतर तारा पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. एका ‘रिपोर्टनुसार, आदित्य आणि तारा आता अधिकृतपणे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या काही काळापासून या दोघांना बॉलिवूडमधील विविध पार्ट्यांमध्ये आणि खाजगी कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहण्यात आले होते, तेव्हापासूनच चाहत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली होती. aditya roy kapoor ‘ओम’ चित्रपटाच्या वर्कशॉप दरम्यान त्यांच्यातील केमिस्ट्री पहिल्यांदा चर्चेत आली होती, जी आता एका घट्ट नात्यात बदलल्याचे दिसते. जरी या दोन्ही कलाकारांनी अद्याप मौन पाळले असले, तरी त्यांना वारंवार एकत्र पाहिल्यामुळे चर्चांनी जोर धरला आहे. Tara Sutaria तारा आणि वीर पहाडिया हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल होते. मात्र २०२६ च्या सुरुवातीला ए.पी. ढिल्लोच्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या एका प्रसंगानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला. त्यांनी ब्रेकअपबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, पण वीरच्या वाढदिवसाला ताराची अनुपस्थिती आणि त्यांचे एकत्र कार्यक्रमात न जाणे, यावरून त्यांच्यातील दुरावा स्पष्ट झाला आहे. त्यानंतर आता तिचे नाव आदित्यसोबत जोडले जात आहे. विशेष म्हणजे दोघांमध्ये १० वर्षांचं अंतर आहे. Tara Sutaria हेही वाचा: Sudesh Kumar Passes Away : अनेक हिट फिल्म्स देणारा दिग्गज अभिनेता काळाचा पडद्याआड! मुंबईत घेतला अखेरचा श्वास