बॉलीवूडमध्ये “मी टू’ची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता दीर्घ काळापासून मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या तनुश्रीने लवकरच कमबॅक करणार असल्याचे सांगितले आहे. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार असून यासाठी तिने कठोर परिश्रम घेत 15 किलो वजन कमी केले आहे. तनुश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या वापसीची घोषणा केली आहे. तिने लिहिले की, मी एका एलएमध्ये आयटी जॉब करत असल्याची चर्चा आहे. माझ्याकडे आयटी सेक्टरमध्ये एक चांगली नोकरी होती, परंतु मी ती स्वीकारली नाही. कारण मी माझ्यातील कलाकाराला जिवंत ठेवू इच्छित आहे. मी माझ्यातील कलाकाराला पुन्हा शोधणार आहे. मी निर्णय घेतला आहे की, मी माझा व्यवसाय बदलण्याची घाई करणार नाही आणि पुन्हा बॉलीवूडमध्ये संधी शोधणार आहे. मी आता भारतात राहून काही मनोरंजक प्रकल्पांवर काम करणार आहे. मला बॉलीवूडमध्ये चित्रपट आणि वेब मालिकेत काम मिळत आहे. दरम्यान, 2003 मध्ये तनुश्रीने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. यानंतर तिने 2005 मध्ये “चॉकलेट’ चित्रटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. त्यावर्षी ती इमरान हाश्मीसोबत “आशिक बनाया’मध्ये झळकली होती.